विकासराव भाऊ.. जनतेचे प्रश्न नाहीत का?
भाग 2
विकासराव भाऊ ...
जनतेचेे प्रश्न दिसत नाही का?
अधिवेशनात मोठमोठ्या घोटाळ्यांची लक्षवेधी आणि तारांकित प्रश्न मांडणारे गंगापूर -खुलताबादचे विकासराव स्थानिक प्रश्नांकडे लक्ष कधी घालणार ?
नागपुर अधिवेशनात घडलेली सत्य घटना
गंगापुर खुल्ताबाद मतदार संघातील एका सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी जामिन रद्द व्हावा व आरोपीला अटक करावी यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यासाठी पीडित मुलीची आई आपल्या दोन चिमुकल्यांसह
नागपुरला गेली होती.भेटीसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली पण आमदाराची शिफारस पञ आवश्यक होते आणि आमदारांच्या शिफारसपत्रा शिवाय मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नसल्याचे सांगत पोलिसांनी या मातेला परिसरात प्रवेश नाकारला. त्यामुळे नाईलाजाने त्या मातेने विधानभवनाबाहेरच उपाशी -तापाशीच मिठा निम दर्गा परिसरात ठिय्या दिला.पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटल्या शिवाय जाणार नसल्याची भूमिका या मातेने घेतली. नागपूरची थंडी कडाक्याची .जवळ पैसे नाही . ऐन थंडीत उपाशी असलेल्या या मायलेकरांना बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जेवण दिले .
ही बाब सत्ताधारी पुन्याच्या भाजपा आमदार मेधा कुळकर्णी यांच्या कानावर गेली. त्यांनी विधानभवन परिसरातून बाहेर येत या मातेची कुटूंबियांची भेट घेतली. पीडित औरंगाबाद जिल्हातील खुल्ताबाद तालुक्यातील सारई गावातील रहिवाशी होते . पिडीत कुटूबांतील सहा वर्षीय मुलीवर गावातीलच एका तरूणाने अत्याचार केला. या घटनेमुळे अल्पवयीन मुलीच्या मानसिकतेवर आघात झाल्याचेही पिडीताच्या मातेने सांगितले. आरोपी तरूणावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक करायला दोन महिने लावले . मात्र आरोपीने जमिनीचे बनावट कागदपत्र न्यायालयात सादर करून झटपट जामीन मिळविला. न्यायालय आणि पोलिस ठाण्याच्या चकरा मारूनही आरोपीला अटक होत नसल्याचे हे कुटूंब व्यथीत होते .
या कुटुंबाची करून कहाणी ऐकून आमदार मेधा कुलकर्णी अस्वस्थ झाल्या . त्यांनी पुढाकार घेतला . आवश्यक ते शिफारस पत्र दिले . आमदार मेधा कुलकर्णी यांनी पोलिसांच्या विशेष शाखेच्या माध्यमातून पीडित कुटूंबियाना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घालून दिली. पिडीतांनी आपली बाजू मांडून न्यायाची मागणी केली. मंत्र्यांच्या भेटीनंतर पिडीत परिवाराने समाधान व्यक्त केले.
वाचले का?
पुण्याचे आमदार आपल्या मतदार संघात लक्ष घालतात आणी आपले विकासराव पुण्यात काक डे व कुल कर्णी कडे लक्ष देतात..
हे प्रकरण दाबण्याचा प्रकार विकासराव कडुन झालेला दिसतोय ? पण सत्यमेव जयते...
मोठ मोठ्या आभ्यास पुर्ण विकासाच्या गप्पा
मारणारे विकासराव पिडीतेला न्याय मिळुन देण्यासाठी आभ्यास का करत नाहीत?
मतदार संघा बाहेरील बाधकाम घोटाळा ,जमीन घोटाळा, रस्ते घोटाळ्यांचे अभ्यासपूर्ण लक्ष वेधी आणि तारांकित प्रश्न मांडता येतात मग
गंगापूर -खुलताबाद मतदारसंघाचे प्रश्नांना लक्ष कधी घालणार ?
मिञांनो आपला कोण परका कोण ओळखायची वेळ आता आली आहे
नविन पर्याय ! नवे नेतृत्व !!
Comments
Post a Comment