१जुन २०१८ शेतकरी संपाचे राष्ट्रीय चालक आता व्यापारी


१जुन २०१८ शेतकरी संपाचे राष्ट्रीय चालक आता व्यापारी


१ जुन २०१७ ऐतिहासिक संप ज्या शडयंत्रीनी संपवून टाकला तेच २०१८ च्या संपाचे स्वयम घोषीत राष्ट्रीय उपाध्यक्ष झाल्यावर संपाची sure shot स्क्रिप्ट तयारच असणार ना?


शेतकरी बांधवांनो ,

पुलतंबा जिल्हा नाशिक येथे सर्व सामान्य शेतकर्यांनी गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनेक मागण्या मान्य करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवर संपाला सुरूवात केली होती, या संपाला विविध ठिकाणी सामान्य शेतकर्यांनी पाढींबा दिला आणी कौतुक केले

पुलतंब्याच्या शेतकरी संपाची धार ओळखुन महाराष्ट्रातील काही शेतकरी कार्यकत्यांनी पुणे येथे राज्य स्तरीय बैठक घेऊन १ जुन पासुन किसान क्रातीच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात संपाची घोषणा दिली त्या बैठकीला औरंगाबाद येथील जेष्ट शेतकरी नेते जयाजीराव सुर्यवशी, विजय काकडे तसेच अनेक कार्यकते उपस्थित होते. 

१ जुन महाराष्ट्र किसान क्रातीच्या संपाची जबाबदारी विभागा नुसार वाटण्यात आली त्यात पुणे विभागात प्रामुख्याने शांताराम कुंजुर, मराठवाडा विदर्भ जयाजीराव सुर्यवशी औरंगाबाद विजय काकडे देण्यात आली त्या अनुशंघाने पहीली पञकार परिषद औरंगाबाद येथे पाठबंदारे विभाग विश्राम ग्रह येथे आयोजित करण्यात आली होती या पञकार परिषदेला जयाजीराव सुर्यवशी, विजय काकडे व मी ( महेश गुजर)  तसेच इतर १ शेतकरी उपस्थित होते. या पञकार परिषदे दरम्यान औरंगाबाद शहरातील सर्व वर्तमान पञ व मिडीयाचे प्रतिनिधि उपस्थित होते यावेळी अनेक पञकारांनी अडचनीचे प्रश्न विचारून संपामुळे शहरी भागातील नागरीकावर अन्याय होईल त्यामुळे शेतकरी संपात सहभागी होणार नाही असे अनेक प्रश्न विचारण्यात आले परंतु शेतकरी समशाची जान असलेले तसेच शेकडो अंदोलनाचा अनुंभवी जयाजीराव सुर्यवशी व विजय काकडे यांनी अत्यंत आभ्यास पुर्ण माडणी व मी केलेल्या युवा शेतकरी पुञांना आहवान केल्यामुळे पञकार संतुष्ट झाले आणी दुसर्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र भर १ जुन किसान क्रातीच्या संपाची चर्चा खर्या अर्थाने सुरू झाली. 
यात सर्व पञकार शेतकरी पुञ असल्याचा व जयाजीराव यांच्या व्यवस्थापनाचा फायदा झाला. 
संपाची बातम्या महाराष्ट्र भर पसरल्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागातुन जयाजीराव व काकडे यांना फोन करून पाढींबा दर्शवनारे फोन सुरू झाले. संपाचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी औरंगाबाद पटेल लाँन्स येथे राज्यस्तरीय नियोजन बैठक बोलवण्यात आली या बैठक साठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्हातुन विविध शेतकरी संघटणेचे पक्षाचे कार्यकते, नेते तसेच सर्व सामान्य शेतकरी उपस्थित होते. 
यावेळी सर्व कार्यकते नेते आपली ओळख करून देत असताना एक डोक्यावरील केस कापलेली किसान क्रातीच्या संपाची टोपी परिधान केलेल्या व्यक्तिने आपले नाव संदिप गड्डे असे सांगीतले तसेच आपला व्यवसाय आहे आणी संपासाठी लागणार्या सर्व साहित्य आपण पुन्यातुन उपलब्ध करून देऊ असे जाहीर केले त्यावेळी अनेकानी शंका उपस्थित केली की आपण हे कोठुन आणणार ? कोणा कडुन आणणार ?आणी का देणार असे विविध प्रश्न विचारून विरोध केला तेव्हा ती व्यक्ति थोडीशी अस्वस्थ दिसली व खाली बसली.त्यानंतर विविध शेतकरी नेत्यांनी आप आपल्या जिल्हात विभागात संपाची तयारी करण्याची जबाबदारी घेऊन संपाचे साहित्य घेऊन निघुन गेली सुमारे ४ वाजता जयाजीराव यांनी मला नौंदनी केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील उपस्थित सदस्यांची नौद वही मागीतली असता ती वही नौदनी करणार्या कार्यकत्या कडुन डोक्यावर केस नसलेल्या व्यक्तिने नेल्याचे कळाले. अधिक चौकशीत हा तो संदिप गड्डे आहे ज्यांने मराठा क्रांति मोर्चाच्या कोल्हापुर बैठकी मराठा मोर्च्या विरोधात फितुरी केल्यामुळे कार्यकत्यांनी धक्का बुकी करण्यात आले हाच तो असे समजल्यावर पुणे विभागातील शांतारामबापु कुंजीर यांना याची माहीती देण्यात आली आणी त्याला कोणतेही जबाबदारी द्यायची नाही असे ठरले. 
१ जुन उजेडला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, नाशीक, पुणे येथे जोरदार संपाला सुरूवात झाली मुबई तसेच शहराकडे जाणार्या सर्व दुध भाजीपाला थाबवण्यात आला.जाणार्या गाड्याचे टायरची हवा सोडण्यात आली, दुध सोडुन देण्यात आले आणी संपला अत्यंत शांततेत सुरूवात झाली. गंगापुर तालुक्यात फक्त माझ्या गावाजवळील लासुर स्टेशन येथे इतिहासात पहील्यांद्या आठवडी बाजार बंद झाला माझ्या गावात सुमारे ६००लिटर दुध शेतकर्यांनी सांडुन दिले आणी औरंगाबाद शहराकडे जाणार्या सर्व दुध भाजीपाला थांबला. 
जस जसी धार संपाची धार वाढत गेली तस तसे महाराष्ट्रात शेतकरी स्वयं स्फूर्तिने संपात सामील होत होते २ जुनला तर संप अत्यंत शांततेत सुरू असताना मिडीयावर तोडफोडीच्या बातम्या यायला सुरूवात झाली जे शेतकरी स्वत संपात शांततेत सामील झाले ते तोड फोड कसे करू शकतात?
यात काही राजकीय डाव तर नव्हता ना? हीच शंका खरी ठरली किसान क्रांतीच्या प्रत्येक योजनाची माहीती मुख्यमंत्री व कृषि राज्यमंत्री यांच्या पर्यत पोहचत होती आणी शेतकर्यांनी चर्चेला जाण्यासाठी वारवार एकच व्यक्ति आग्रह करत होती शेतकरी संपाच्या वेगवेगळ्या बातम्या पसरवत होती कोण होती ती व्यक्ति? 
ती व्यक्ति होती तो जो संपाचे संपूर्ण साहित्य पुरवणार होता ,तोच पुण्यातुन किसाम क्रांति संपाची सर्व माहीती सरकार पर्यत पोहचवत होता. ती व्यक्ति म्हणजे संदीप गड्डे. कोण आहे तो? तो आहे एक सरकारी ठेकेदार, कृषी विषयी विविध योजनाची ठेका घ्यायचा ,राज्यात सरकारचे कृषि प्रदर्शन आयोजित करने आणी त्याची माहीती वेगवेगळ्या कार्यक्रमा द्वारे शेतकर्यांना द्यायचा. सरकारने केलेल्या कामाची प्रसिद्धी करण्यासाठी ज्याची एजेंसी काम करते तो व्यक्ति शेतकर्यांच्या हिता पेक्षा आपला व्यवसाय कसा चालेल हेच महत्वाचे होते त्यासाठी तो किसान क्राती संप कसा बदनाम होईल आणी कशी  लवकर चर्चा होईल याच्या साठी प्रयत्नशील होता. आपला व्यवसाय टिकवण्यासाठी मुख्यमंत्री कृषि मंत्री यांच्या सोबत आपले संबंध कसे चांगली राहील या जास्तीत जास्त संपाची माहीती पुरवत होता. त्यासाठी त्याला एका खासदाराची सुद्धा मदत होत होती.. याच संदिपने मराठा क्रांति मोर्चा मँनेज करण्यासाठी विविध मराठा नेत्यांना सरकार दरबारी लाभाचे पद देण्याचे बैठकी घेण्याचे पर्यत केले परंतु मराठा कार्यकत्यांनी त्याला चांगलाच चोप दिला होता.. 
३ तारखेला मुख्यमंत्री यांनी जयाजीराव यांच्या खांद्यावर हात ठेवला आणी म्हणाले की मिडीया जवळ जास्त बोलु नका सभाळुन घ्या तेव्हा ह्याच ठेकेदाराने कृषि राज्य मंत्री यांच्या बंगल्यावर मिडीया पाठवली आणी संपाची बदनामी केली तोच ठेकेदार संदिप १ जुन २०१८ राष्ट्रीय शेतकरी संपाचा स्वयंघोषीत राष्ट्रीय उपाध्यक्ष होऊन बसला आहे आता मला सांगा ज्याला शेतकर्यांनी. शेतकरी पुञांनी.शेतकरी नेत्यानी जी किसान क्रातीची मशाला इमाने इतबारे हाती घेतली होती त्याच्या कार्यावर अन्याय नाही का? 
जर अशा व्यापारी ठेकेदाराच्या हाती राष्ट्रीय शेतकरी संपाची मशाल दिल्यावर शेतकर्यांचे भविष्य जळाल्या शिवाय राहणार नाही का?
आपण जब सच्चे किसान क्रातीचे कार्यकते असाल तर  अशा ठेकेदार नेतृत्वाचा जाहिर विरोध करायला हवा... 
मी करणार विरोध कारण मी शेतकरी पुञ आहे व्यापारी नाही... 
जय जवान जय किसान 
आवडल्यास पुठे पाठवा
महेश गुजर
संस्थापक सदस्य किसान क्रांति 

Comments

Popular posts from this blog

सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होणारा अन्याय थांबवा

विकासराव भाऊ.. जनतेचे प्रश्न नाहीत का?

उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रम अंतर्गत आज शेतकरी मेळावा संपन्न