कोरडा विकास.. आभ्यासु विकास

कोरड्या प्रकल्पात रंगली कागदी होड्यांची स्पर्धा.

शासनाच्या ऊदासीन धोरणामुळे चुकीच्या 2003 साली पुर्ण झालेल्या शिल्लेगाव प्रकल्प परीसरातील गावांची तहान भागविण्यासाठी अयशस्वी ठरला आहे. मागील सहा वर्षांपासुन हा प्रकल्प कोरडा ठाक पडला असुन या प्रकल्पात पाणी येण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गंगापुर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने दि 9 जानेवारी रोजी शिल्लेगाव मध्यम प्रकल्पात शालेय कागदी होड्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .

          शिरेगाव आणी देवळी या दोन्ही गावची 905 हेक्टर जमिन संपादित करून 1300 हेक्टर लाभक्षेत्र असनारा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने 2003 मधे पुर्ण केला मार्तंडी नदीवर बांधण्यात आलेल्या या प्रकल्पात  पावसाळ्यात 8.19 दशलक्ष घनमीटर पाणी येते तर पावसाळा संपल्यावर याच नदीवर 0.41 दशलक्ष घनमीटर पाणी येते .या प्रकल्पाची एकुन 8.60 दशलक्ष घनमीटर  पाणी  साठवण क्षमता आहे. परंतु पाण्याचे स्त्रोतच नसल्याने मागील सलग सहा वर्षांपासुन हा प्रकल्प कोरडा ठाक पडला आहे.या प्रकल्पात 10 ते 12 गावातील पाणीपुरवठा योजनेच्या विहीरी आहे.प्रकल्पात पाणीच नसल्यामुळे कोट्यावधी रूपये खर्च करून ही हा प्रकल्प व पाणीपुरवठा योजना अयशस्वी झाल्या आहेत.

       या प्रकल्पात पाणी आणण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी कागदी घोडे नाचवले तसेच अनेक संघटना कडुन ही पाठपुरावा झाला .परंतु पाटबंधारे विभागाच्या कुचकामी अधीकार्याकडुन या विषयी पाठपुरावा न झाल्याने हा प्रकल्प आजही कोरडा आहे .दि 4 जानेवारी रोजी निवेदन देऊन सुध्दा शासनाचा कोणताही अधिकारी या कोरड्या प्रकल्पाकडे फिरकला नाही .शासनाचे तसेच स्थानिक पुढ्यार्याचे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता . या उपक्रमात सहभागी झालेल्या आंनद मैराळ या विद्यार्थीला  ऊत्कृष्ट होडीचा पुरस्कार देण्यात  तसेच सहभागी झालेल्या सर्वानी कागदी होडी बनवुन प्रशासनाचा निषेध केला
निवेदन देऊन सुध्दा संबंधीत प्रशासनाचा कोणताही अधिकारी अंदोलन स्थळी चर्चा करण्यासाठी फिरकला आणी त्यामुळे प्रशासनाला शेतकर्यांच्या तसेच प्रकल्प ग्रस्तांच्या अडचनी समजुन घेण्यात काही रस दिसत त्यामुळे पुढील काळात त्यांच्या कार्यालयवर ठिया अंदोलन करण्यात येईल ...         महेश गुजर समन्वय शेतकरी संघर्ष कृती समीती.


या वेळी मनसेच तालुका अध्यक्ष अन्नासाहेब जाधव, शेकापचे महेश गुजर, गणेश सोनवने, दिगंबर गोटे, संभाजी ब्रिगेडचे संकेत मैराळ ,पप्पूलाल कुकलारे , संदीप पवार , कीशोर काळे , सतीष जाधव , पंकज जगदाळे, भगवान जाधव, प्रदीप जाधव , सुभाष चव्हाण, नितीन वाघ , सतीष पवार, समाधान पवार , सुरेश कऱ्हाळे, विलास काकडे , आदींनी या अंदोलनामधे सहभाग नोंदविला

Comments

Popular posts from this blog

सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होणारा अन्याय थांबवा

विकासराव भाऊ.. जनतेचे प्रश्न नाहीत का?

उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रम अंतर्गत आज शेतकरी मेळावा संपन्न