विकास याला म्हणतात...

पिपळगाव दिवशी येथे जानकीदेवी बजाज अंतर्गत 82 लाखाच्या जलसंधारणाच्या कामाचा शुभारंभ

आज दि 1 फेब्रुवारी रोजी पिपळगाव दिवशी ता.गंगापुर येथे जानकीदेवी बजाज संस्था तसेच लोकसभातुन लघु मध्यम प्रकल्पातील गाळ काढणे तसेच खोलीकरणासाठी 77 लाख रूपये मंजुर करण्यात आहे . 1 फेब्रुवारी रोजी पहील्या टप्यातील काम सुरू करण्यात आले तसेच गुजर मळा शिवारातील जुन्या कोल्हापुरी बंधार्यातील 5 लाखाचे खोलीकरण रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे .

यावेळी जानकी देवी बजाज संस्थेचे काकडे साहेब  ,सरपंच संतोष जाधव ,जलसंधारण समीती व तंटामुक्ती अध्यक्ष राधाकिशन गुजर गुरुजी, ग्रामसेवक शेख साहेब  ग्रामपंचायत सदस्य मच्छींद्र भिंगारे, योगेश वर्णे ,रतन बडोगे गणेश वावरे ,उत्तम वावरे ,संदीप वर्णे, शेतकरी कामगार पक्षाचे महेश गुजर, सुनिल वावरे, शंकर बडोगे, संदीप वर्णे, दादा बडोगे, न्यानेश्वर बडोगे, संतोष वावरे, बाळु वावरे, कृष्णा वावरे, सचिन वावरे, सतिष चंदीले, कडुबा चंदीले ,बापु शेंगुळे, गणेश गुजर यांच्या सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
पिपळगाव दिवशी येथे जानकीदेवी संस्थे मार्फत 2013 पासुन जलसंधारण, फिल्टर प्लांट, शाळेसाठी संगणक, डिजीटल ,क्लास रूम, होतकरू तरूणांना गाईचे वाटप असे विविध कामे करण्यात आली आहे. या कामासाठी राधाकिशन गुजर, संतोष जाधव, शेख साहेब तसेच गावातील युवकांनी  वेळो वेळी पुढाकार घेऊन जानकी देवी बजाज कर्मचारी व नागरीक यांच्यात सुसंवाद निर्माण केला आहे. 
येत्या काळात जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या नविन ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे तसेच आ.सतिश चव्हाण यांच्या निधीतुन दिवशी ते कसाबखेडा रस्ताचे डाबरीकरण तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानीताई कृष्णा पा डोणगावकर यांच्या प्रयत्नातुन पिपळगाव ते देवपुडी रस्त्याचे डाबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.


Comments

Popular posts from this blog

सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होणारा अन्याय थांबवा

विकासराव भाऊ.. जनतेचे प्रश्न नाहीत का?

उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रम अंतर्गत आज शेतकरी मेळावा संपन्न