Posts

Showing posts from 2020

पिंपळगाव,दिवशी,वरझडी,पाचपिरवाडी ग्रामपंचायतच्या वतिने निर्जंतुकीकरण फवारणी मारण्यात आली

Image
पिंपळगाव,दिवशी,वरझडी,पाचपिरवाडी ग्रामपंचायतच्या वतिने निर्जंतुकीकरण फवारणी मारण्यात आली केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लाॅक डाऊन करून सुद्धा दिवसेंदिवस कोरोना संशयित रुग्णाची संख्या वाढत आहे त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तसेच अवकाळी पावसामुळे पिंपळगाव दिवशी संपूर्ण गावात तसेच शेत वस्तीवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.  सकाळी ९ वाजता संपूर्ण गावात दंवडी देऊन सर्वांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले तसेच टॅक्टर वर मशीन लावुन संपूर्ण गावात सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रत्येक घराच्या बाहेर फवारणी करण्यात आली .  यावेळी ग्रामपंचायत सरपंच पती गणेश वावरे ग्रामपंचायत सदस्य प्रविण थोरात दादासाहेब गायकवाड,रतन बडुगे ग्रामसेवक ए के शेख , तंटामुक्ती अध्यक्ष राधाकृष्ण गुजर,  पोलीस पाटील,शंकर बडुगे,मनसेचे भाई महेश गुजर, गणेश गुजर, कृष्णा वावरे, सोनु गुजर, सचिन वावरे, संजय वावरे, अमोल वावरे ग्रामपंचायत शिपाई नन्नवरे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

छावा क्रांतीवीर सेना आयोजित हळदी कुंकू शाही थाटात संपन्न

Image
छावा क्रांतीवीर सेना आयोजित हळदी कुंकू समारंभ शाही थाटात संपन्न किरण पानकर(विशेष प्रतिनिधी)        आज छावा क्रांतिवीर सेना युवा महिला आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष छायाताई खैरनार आयोजित हळदी कुंकू समारंभ अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद  शाहू कॉलेज , लक्ष्मी नगर येथे मोठ्या शाही थाटात संपन्न झाला...              यावेळी अ.भा.म.शिक्षण परिषद पुणे , जनरल सेक्रेटरी सौ.प्रमिलाताई गायकवाड ,  सौ.सरलाबाई खैरनार,,सौ.मीनाताई जाधव(मराठा महासंघ पुणे शहर अध्यक्षा),सौ.दिपाली पाडले,(मराठा महासंघ,पुणे शहर उपाध्यक्ष), सौ.स्मिता मुळीक,सौ.वैशाली कानडे,सौ.संगीता भोंडे,सौ.शीतल पिसे ,सौ.सविता मुजुमले,अनिता हिंगणे,सौ.मंगलाताई अभंग,कार्यक्रमाचे मनोगत छावा क्रांतिवीर सेना, सौ.ललिता उबाळे(पश्चिम महाराष्ट्र,सरचिटणीस) यांनी केले. यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी छावा क्रांतीवीर युवा महिला आघाडी सेना प्रदेश अध्यक्षा छायाताई खैरनार यांनी मार्गदर्शन करून सविस्तर मार्गदर्शन केले.व उपस्थित प्रमुख पाहुणे व उपस्थित महिला भगिनींचे आभार म...

सामाजिक कार्यकर्ते गुजर गुरूजी यांचा सन्मान

Image
*उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते गुजर गुरूजी यांचा सन्मान*       गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी फाटा(बिमरोट वस्ती) येथे कॉटन कनेक्ट साउथ एशिया प्रा.ली व संजीवनी सक्षमीकरण संस्था यांच्या वतीने  उत्तम कापूस निर्मिती शेतकरी मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला परिसरातील तसेच गंगापुर खुल्ताबाद तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थिती होते . यावेळी प्रगतिशील  शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते आदर्श शिक्षक राधाकृष्ण गुजर (गुरूजी)यांचा संजीवनी सक्षमीकरण विकास संस्थाच्या वतीने शाल , श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विजयसिंग बिमरोट , उपसरपंच कारभारी गुसीगे , शेकापचे प्रवक्ते भााई महेश गुजर , दिवशी पिंपळगाव चे सरपंच गणेश वावरे , नेपाल नायमने , मनसेचे विलास काळेे ,झेलसिंग बिमोड यांची प्रमुख उपस्थिती होती.     या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्ष प्रवक्ते भाई महेश गुजर यांच्या वतीने किरण पानकर यांनी परिसरातील ४० जेष्ठ महीला व पुरूष शेतकर्याच शाल देऊन कृतज्ञता म्हणून सत्कार करण्यात आला.   शेतकरी मेळावा यशस्वी करण्यास...

उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रम अंतर्गत आज शेतकरी मेळावा संपन्न

Image
उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रम अंतर्गत आज शेतकरी मेळावा संपन्न (विशेष प्रतिनिधी)       आज गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी फाटा(बिमरोट वस्ती) येथे कॉटन कनेक्ट साउथ एशिया प्रा.ली व संजीवनी सक्षमीकरण संस्था यांच्या वतीने  उत्तम कापूस निर्मिती शेतकरी मेळावा संपन्न झाला...          या मेळाव्याला ................... जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्णजी गुजर सर , विजयसिंग बिमरोट , उपसरपंच कारभारी गुसीगे , शेकाप चे प्रवक्ते महेशकूमार गुजर , दिवशी पिंपळगाव चे सरपंच गणेश वावरे , नेपाल नायमने यांची प्रमुख उपस्थिती होती...     यावेळी प्रमुख पाहुण्यांनसह   शेतकरी बांधवांचा संजीवनी सक्षमीकरण विकास संस्था च्या वतीने शेतकऱ्यांचा शाल , श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला... यावेळी हा शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी संदीप पानकर , सुनील वावरे , काकासाहेब चव्हाण यांच्यासह संजीवनी सक्षमीकरण विकास संस्थेचे पदाधिकारी व समन्वयक यांनी परिश्रम घेतले.