सामाजिक कार्यकर्ते गुजर गुरूजी यांचा सन्मान

*उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते गुजर गुरूजी यांचा सन्मान* गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी फाटा(बिमरोट वस्ती) येथे कॉटन कनेक्ट साउथ एशिया प्रा.ली व संजीवनी सक्षमीकरण संस्था यांच्या वतीने उत्तम कापूस निर्मिती शेतकरी मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला परिसरातील तसेच गंगापुर खुल्ताबाद तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थिती होते . यावेळी प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते आदर्श शिक्षक राधाकृष्ण गुजर (गुरूजी)यांचा संजीवनी सक्षमीकरण विकास संस्थाच्या वतीने शाल , श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विजयसिंग बिमरोट , उपसरपंच कारभारी गुसीगे , शेकापचे प्रवक्ते भााई महेश गुजर , दिवशी पिंपळगाव चे सरपंच गणेश वावरे , नेपाल नायमने , मनसेचे विलास काळेे ,झेलसिंग बिमोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्ष प्रवक्ते भाई महेश गुजर यांच्या वतीने किरण पानकर यांनी परिसरातील ४० जेष्ठ महीला व पुरूष शेतकर्याच शाल देऊन कृतज्ञता म्हणून सत्कार करण्यात आला. शेतकरी मेळावा यशस्वी करण्यास...