सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होणारा अन्याय थांबवा

माननिय मुख्यमंत्री साहेब , माननिय ग्रामविकास मंत्री महोदया, मुख्य सचिव ग्रामविकास मंञालय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य विषय :- सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होणारा अन्याय थांबवा स.न.वि.वि., सरपंच म्हणजे कोण हे घटनेच्या तरतुदीनुसार गावाचा प्रथम नागरिक , अख्या गावाच्या समस्या सोडवणारा प्रधान म्हणजे सरपंच , गावाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी २४*७ काम निस्वार्थ काम करणारा सरपंच. परंतु सखोल विचार केला तर सरपंच ,उपसरपंच व सदस्य यांना सरकार काय सुविधा देते ? ग्रामपंचायतचा प्रमुख असून सुद्धा त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या ग्रामसेवकला २५ ते ३० हजार , शिपाई ५००० , ऑपरेटर ६००० ,(ऑपरेटर पुरवणाऱ्या कंपनीला कमिशन सुद्धा सरपंच,उपसरपंच व सदस्य यांच्या महिन्याच्या एकूण मानधना पेक्षा 10 पट जास्त असते) जो सर्व गाव समितीचा अध्यक्ष असतो ,तो सगळ्यात मागे , यावर तोडगा निघाला पाहिजे पूर्वी गावातील श्रीमंत माणूस सरपंच असायचा म...